---------------------------------------------------------------
अमळनेर - येथील प्रहार अपंग क्रांती संघटना यांच्याकडून राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर तालुक्यातील दिव्यांगांसाठी लोकमान्य टिळक स्मारक टाऊन हॉल येथे झालेल्या कार्यक्रमात तहसिलदार मिलिंदकुमार वाघ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी तहसिलदार वाघ यांच्या हस्ते श्री योगेश मोहन पवार यांना तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

आता पर्यंत केलेल्या कामाची दखल घेऊन श्री योगेश पवार यांना संघटनेच्या पुढील वाटचालीस अधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बंधू यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री.भरत चौधरी यांच्या हस्ते नूरखान पठाण यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. या कार्यक्रमात प्रहार अपंग क्रांती संघटना अमळनेरची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.तिलोत्तमाताई पाटील या होत्या. यावेळी महेश देशमुख, विजय पाटील(विजू मास्तर) सुरेश पाटील (सरपंच सुंदरपट्टी), प्रताप आबा शिंपी(नगरसेवक) आदी उपस्थित होते.

कार्यक्रमास गिरीश कुलकर्णी,
बहिरम सर, भरत जाधव,प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष प्रविण पाटील यांनी सहकार्य केले.
प्रहार संघटना कार्यकारिणी
तालुकाध्यक्ष :- योगेश मोहन पवार
शहराध्यक्ष:- नूरखान मुक्तारखा पठाण
महिला शहराध्यक्ष:- नयना महेंद्र सोनार
सहसचिव:- नयन मनोहर फडके
खजिनदार :- दिनेश शशी बागडे
सहखजिनदार:- रवींद्र एकनाथ साळूंके
कोरोना योद्धा सन्मान
अमळनेर तालुक्यातील कोविड- १९ आपत्ती मध्ये योगदान दिलेल्या अधिकारी,सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बंधू आले
तसेच लोहा येथील आत्महत्या केलेल्या दिव्यांगांसाठी श्रद्धांजली योगदान दिलेल्या अधिकारी,सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बंधू यांना कोरोना योध्दा असे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.तसेच लोहा येथील आत्महत्या केलेल्या दिव्यांगाना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सांगता झाली.
No comments
Post a Comment