"प्रताप"च्या तीन विद्यार्थिनी ठरल्या विद्यापीठ सुवर्ण पदकाच्या मानकरी खा.शि.मंडळाच्या पदाधिका-नी केले सन्मानित

Saturday, July 3, 2021

/ by Amalner Headlines
---------------------------------------------------------------
                     - * जाहीरात * -
-------------------------------------------------------------------
अमळनेर - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०१९ - २० मध्ये घेण्यात आलेल्या विविध परीक्षेत प्रताप महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थिनींनी सुवर्णपदक पटकावले आहे. यात गणित विभागातील काजल नारायण मराठे या विद्यार्थिनीने बीएससी ला ९५.७३ गुण मिळवून विद्यापीठात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तर सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील विद्यार्थिनी राजकमल प्रवीण पाटील हि एम.एस्सी. या वर्गाच्या परीक्षेत ८७.३५ गुण मिळवून विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तसेच मराठी विभागातील एम.ए. च्या परीक्षेत सौ. ज्योत्स्ना राहुल कांबळे यांनी  ९५.६० इतके गुण मिळवून विद्यापीठात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. या तीनही सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनींचे प्रताप महाविद्यालयाच्या वतीने खान्देश शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते  सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन नुकताच गौरव करण्यात आला आहे. याप्रसंगी खान्देश शिक्षण मंडळाचे संचालक नीरज अग्रवाल यांनी आपल्या मनोगतातून म्हटले की,खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील या तीनही विद्यार्थिनींनी जे घवघवीत यश मिळवले आहे ही कौतुकास्पद बाब आहे. तीनही सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या विशेष म्हणजे या तीनही गुणवंत मुलीच आहेत. ही विशेष बाब आहे. मुळात अनेकांसाठी ही प्रेरणादायी गोष्ट आहे. खान्देश शिक्षण मंडळ हे  महाविद्यालयासाठी व विद्यार्थ्यांसाठी यापुढेही नेहमीच तत्पर राहून सहकार्य करत राहील. असेच विदयार्थ्यांनी यापुढेही यश मिळवत रहावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी ज्योत्स्ना कांबळे व काजल मराठे या गुणवंत विद्यार्थिनींनीही आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. या गुणवंतांच्या सत्कार सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष अनिल कदम, कार्याध्यक्ष जितेंद्र जैन, संचालक हरिभाऊ भिका वाणी, योगेश मुंदडे, डॉ.संदेश गुजराथी,नीरज अग्रवाल,प्रदीप अग्रवाल,चिटणीस डॉ.अरुण जैन,उपप्राचार्य डॉ.एम.एस.वाघ, उपप्राचार्य डॉ. जी.एच. निकुंभ, उपप्राचार्या डॉ.कल्पना पाटील, आईक्यूएसी समन्वयक डॉ. जयेश गुजराथी,गणित विभागप्रमुख डॉ.नलिनी पाटील, सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. एस.ए.जोशी, मराठी विभागप्रमुख डॉ.रमेश माने, मराठी विभागातील प्रा.ज्ञानेश्वर कांबळे,प्रा. योगेश पाटील, प्रा. विलास गावीत, प्रा. ज्ञानेश्वर खलाणे, गणित विभागातील डॉ.वंदना पाटील प्रा.वैशाली पाटील, सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील प्रा.वैशाली महाजन, प्रा. हेमलता सूर्यवंशी, प्रा. दिशा पाटील प्रा.पल्लवी बाविस्कर, महाविद्यालयाचे लेखापाल श्री. राकेश निळे,श्री भटू चौधरी तसेच पालक वर्गही यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपप्राचार्या डॉ. कल्पना पाटील यांनी केले तर आभार मराठी विभाग प्रमुख डॉ. रमेश माने यांनी मानले.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines