---------------------------------------------------------------
अमळनेर - येथील नपाचे मुख्याधिकारीपदी श्री प्रशांत सरोदे यांची नुकतीच बदली झाली असून त्यांनी पदभार स्विकारला आहे. येथील ग्राहक पंचायत शाखेने त्यांचे स्वागत केले आहे. दिनांक ७ जुलै २०२१ रोजी कोपरगाव येथून अमळनेर नगर परिषदेत कर्तव्यदक्ष व मनमिळावू मुख्याधिकारी श्री प्रशांत सरोदे हे रूजू झाले आहेत. अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर शाखेतर्फे त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी ग्राहकांचे विविध प्रश्नावर साधक-बाधक चर्चा करण्यात आली. मुख्याधिकारी श्री सरोदे यांनी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले.

याप्रसंगी ग्राहक पंचायतीच्या अध्यक्षा अॅड. भारती अग्रवाल, सचिव सौ. कपिला मुठे, सहकोषाध्यक्ष सौ.अंजू ढवळे, जिल्हा सहसंघटक मकसूदभाई बोहरी, जिल्हा बँकिंग व सायबर क्राईम प्रमुख विजय शुक्ला, जिल्हा ऊर्जा समिती प्रमुख सुनील वाघ व ताहा बुकवाला उपस्थित होते. अशी माहिती तालुका सहसंघटक सौ मेहराज बोहरी यांनी दिली आहे.
…….................................................. ............
अमळनेर विधानसभा मतदार संघाचे भुमिपुत्र आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची अमळनेर हेडलाइन्सचे उपसंपादक रोहित बठेजा यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
'''''''''''''''''''''''""""""""""""""""""""""""""""
No comments
Post a Comment