---------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------
अमळनेर - येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे पोलिस दलात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या अमळनेरच्या भुमीपुत्रांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा दि.२२ जुलै २०२१ रोजी संपन्न झाला. अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर ही ग्राहकांच्या कल्याणासाठी झटणारी, त्यांच्या अडीअडचणी सोडवणारी एक चळवळ आहे. परंतु समाजातील कर्तव्यदक्ष तसेच समाजासाठी उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा सुध्दा सन्मान, सत्कार करणारी अशी नावलौकीकास आलेली पंचायत आहे. असाच एक छोटेखानी सेवापुर्ती सत्कार सोहळा अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेरतर्फे नुकताच साजरा करण्यात आला.
अमळनेरचे भुमीपुत्र व पोलिस दलात उत्तुंग अशी कामगिरी करणारे माजी सहा.पोलिस आयुक्त श्री राजेंद्र भामरे तसेच माजी पोलिस उपअधिक्षक श्री मंगलसिंग सुर्यवंशी यांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा नुकताच अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे सत्कारमुर्तीना शाल व पुष्पगुच्छ देवून करण्यात आला. या कार्यक्रमात श्री राजेंद्र भामरे साहेब यांनी आपल्या बुध्दीचातुर्याने श्रोत्यांशी चर्चात्मक पध्दतीने संवाद साधत श्रोत्यांच्या प्रश्नाची उत्तरे दिली. पोलिस दलातील एक अधिकारी असो वा शिपाई हा नेहमीच पोलिसाच्या बाजुचाच विचार करून आपले विचार मांडत असतो, तो कधीही पोलिस दलाच्या विरोधात बोलत नसतो याची प्रचिती साहेबांच्या संवादातून स्पष्टपणे जाणवत होती. एक अधिकारी हा जरी वयोमानानुसार निवृत्त झाला तरी तो नेहमीच कर्तव्यावर असतो हेसुध्दा यातून जाणवत होते. समाजात होणारे गुन्हे हे नेहमी लालसेपोटी होत असतात हेसुध्दा त्यांनी आपल्या या चर्चात्मक संवादात सांगितले. विविध विषयांवर साहेबांचा हातखंडा होता हेही त्यांच्या बोलण्यातून जाणवले. त्यांनी पोस्को कायदा, सायबर क्राईम, बॅंकेशी संबंधीत विविध गुन्हे याविषयी आपल्या बोलण्यातून जनतेने काय सावधगिरी बाळगली पाहिजे या विषयावर आपले विचार मांडले. कर्तव्यावर असतांना आलेल्या गुन्हयांविषयी व ते सोडवतांना झालेली कसरत याविषयी साहेबांनी एक पुस्तकच काढायचे आहे असे आपल्या बोलण्यातून श्रोत्यांना सांगितले.

श्रीयुत मंगलसिंग सुर्यवंशी यांनीसुध्दा श्रोत्यांच्या मनातील अनेक प्रश्नाना योग्य असे मार्गदर्शन केले. आपल्या अमळनेरच्या पावन भुमीला जी सत्याची आणि स्वाभिमानाची जोड आहे तेच गुण या दोघेही कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी आपल्या संपुर्ण पोलीस दलाच्या सेवा कालावधीत ठिकठिकाणी नोकरी बजावत असतांना दाखवून दिले. या कार्यक्रमाचा योग घडवून आणण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे माजी अध्यक्ष श्री मकसुदभाई बोहरी व माजी तालुका संघटक श्री राजेंद्र सुतार यांचे फार मोठे योगदान आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन योगेश पाने यांनी केले तर प्रास्ताविक हे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे माजी अध्यक्ष श्री मकसूदभाई बोहरी यांनी केले. प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांचा परिचय विजय शुक्ल यांनी करून दिला. तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे विविध क्षेत्रातील आपल्या कार्याचा चढता आलेख हा अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या अध्यक्षा अॅड.सौ.भारती अग्रवाल यांनी प्रमुख पाहुण्यांना करून दिला.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास अखिल भारतीय पंचायतीचे तालुका संघटक सौ. करूणा सोनार, सहसंघटक मेहराज बोहरी, सचिव सौ. कपिला मुठ्ठे, उपाध्यक्षा सौ.स्मिता चंद्रात्रे, कोषाध्यक्षा सौ.वनश्री अमृतकार, सह कोषाध्यक्ष अंजू ढवळे, सौ. मैराळे तसेच उर्जा मित्र श्री सुनिल वाघ, महेश कोठावदे, राजु भामरे, दिलीप नेरकर, ताहा बुकवाला, खदिर सादिक, मधुकरराव सोनार, पत्रकार जयंतीलाल वानखेडे आदि उपस्थित होते.
No comments
Post a Comment