कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल
-------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------
अमळनेर - तालुक्यातील वावडे येथील विज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता श्री विजय गुर्जर हे आपल्या कर्मचारी पथकासह थकीत विज बिल वसुली व कार्यवाहीसाठी वावडे गावात गेले असता एका व्यक्तीने कारवाईत अडथळा निर्माण केला व धमकी दिल्याप्रकरणी मारवड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.काय आहे घटना
वावडे येथील फुलसिंग मोतिराम भिल यांचे विज बील थकल्याने कारवाईसाठी गेलेले सहाय्यक अभियंता श्री विजय गुर्जर व पथकातील सहकारी मिटर जप्त करून जात असतांना आरोपी रमेश देविदास मालचे (रा.भरवस) हा आला व त्याने आम्ही ए/सी सरकार आहे, महाराष्ट्र सरकार मानत नाही, भारत सरकारचा आदेश दाखवा असे बोलुन फिर्यादीचे गाडीची चावी काढुन घेतली व अटकाव करून ॲट्रोसिटी व चोरीचा गुन्हा दाखल करेल अशी धमकी देवुन सरकारी कामात अडथळा आणला, म्हणुन त्याचे विरूध्द मारवड पोलीसात गुरनं १०६ /२१ भादंवि कलम ३५३,३४१,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार साळुंखे करीत आहेत.
No comments
Post a Comment