-----------------------------------------------------------------
अमळनेर - शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम व जलद करण्यासाठी पोलीस दलाने अमळनेर शहरात Radio Frequency Identification Device (RFID) ही अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित केली आहे. जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढे यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी या यंत्रणेचा शुभारंभ करण्यात आला. पूर्वी शहरात गस्त घालत असतांना त्या भागात पोलीसांनी निश्चित केलेल्या ठिकाणी डायरीमध्ये तशी नोंद करण्याची पध्दत होती.पण आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यंत्रणा अधिक सक्षम करण्याची सुचना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे यांनी अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गोरे व उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी सदर यंत्रणा सुरू करण्याच्या उद्देशाने शहरातील नवीन कॉलनी परिसर,शाळा व कॉलेज परिसर,गर्दीच्या जागा या भागाचे सर्वेक्षण करण्यात आले.
त्यानंतर शहरातील उद्योजक ओमप्रकाश मुंदडा,सरजूशेठ गोकलाणी, प्रशांत निकम यांचे सहकार्यातून आरएफआयडी यंत्रणा बसविण्यात आली.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आरएफआयडी टॅग यंत्रणा बसविल्यामुळे पोलीसांची गस्त असलेल्या परिसर,गर्दीची ठिकाणे याठिकाणच्या चोरी,छेडखानी या घटनांना आळा बसणार आहे.
५० टॅग व ४ मॉनिटरींग युनिट
अमळनेर शहर व नवीन कॉलनी परिसरात एकूण ५० ठिकाणी आरएफआयडी टॅग लावण्यात आले आहेत.
त्यांच्या मॉनिटरींगसाठी ४ युनिट सुरू करण्यात आले आहे. या यंत्रणेचा शुभारंभ नुकताच स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गोरे,उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव,पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थिती होते

ही यंत्रणा सुरू झाल्याने शहरात रात्रीचे वेळी होणा-या चो- या,छेडखानी घटनांना आळा बसणार आहे.