अमळनेरात १०० फुट स्तंभावर ध्वजारोहण नगर परिषदेने उभारला स्तंभ ध्वजारोहणास आमदारांसह सामाजिक,राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची होती उपस्थिती

--------------------------------------------------------------
                       - * जाहीरात * -
----------------------------------------------------------------

अमळनेर - येथील नगर परिषदेच्या वतीने अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा चौकात आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलने १००.३ फूट स्तंभाचे ध्वजारोहण करण्यात आले. नपाच्या
लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे, विरोधी पक्ष गटनेते प्रवीण पाठक, तहसीलदार मिलिंद वाघ, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड एपीआय एकनाथ ढोबळे,राकेश परदेशी,राहुल लबडे,पो.ना. डॉ.शरद पाटील,मधुकर पाटील प्रमुख अतिथी म्हणून हजर होते.
       तसेच या वेळी तालुक्यातील राजकीय ,सामाजिक ,पत्रकार ,व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ३० बाय २० फूट आकाराचा ५० किलो वजनाचा ध्वज डौलाने आकाशात फडकवण्यात आला. अनेक नागरिकांनी या राष्ट्रीय सोहळ्याचा आनंद घेतला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.