--------------------------------------------------------------
अमळनेर - तालुक्यातील मारवड पोलीस स्टेशनचे एपीआय राहुल फुला यांची जळगाव येथे पोलीस अधिक्षक कार्यालयात बदली झाली असून त्यांच्या जागी जळगाव येथून जयेश खलाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दि.२८ रोजी मारवड पोलीस स्टेशनला श्री राहुल फुला यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स. फौ. बाळकृष्ण शिंदे हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे पत्रकार डॉ. विलास पाटील,सामाजिक कार्यकर्ते उमाकांत साळुंखे,पोलीस पाटील डॉ. दत्ता ठाकरे हे उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करतांना दत्ता ठाकरे यांनी सपोनि राहुल फुला यांच्या कामगिरी व कामकाजाचे कौतुक केले. तसेच दोन वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी प्रत्येक नागरिकांना किंवा पोलिस स्टेशनला आलेल्या ग्रामस्थांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून कमीत कमी गुन्हे दाखल करून त्यांच्यात समजोता करून देण्याचा प्रयत्न केला.
सपोनि राहुल फुला यांनी ठाण्यातील सर्व कर्मचारी,पोलीस पाटील व परिसरातील नागरिकांचे आभार मानले. तसेच मारवड पोलीस ठाण्यातील कार्यकाळ कायम लक्षात राहील असे सांगितले.
मारवड पोलीस स्टेशनमध्ये पोलीस सहका-यांनी राहुल फुला यांची घोड्यावर मिरवणूक काढली.
यावेळी मारवड पोलीस स्टेशनचे कर्मचारी बाळकृष्ण शिंदे, फिरोज बागवान, सुनील तेली, सुनील अगोने, राजू पाटील, प्रकाश साळुंखे, विशाल चव्हाण, गुलाब महाजन, विनोद पाटील, संजय पाटील, कैलास सोनार, भास्कर पाटील, प्रशांत पाटील, अनिल राठोड, नेहा बारेला, बशीर शेख यांच्यासह ठाण्याअंतर्गत असलेले सर्व पोलीस पाटील हजर होते.

