अमळनेरचा सारांश सोनार ‛अमरहिंद’ वक्तृत्व स्पर्धेचा विजेता मानाच्या स्पर्धेतील विजेतेपद - सारांशचे सर्वत्र अभिनंदन

-------------------------------------------------------------
                           - * जाहीरात * -
--------------------------------------------------------------
अमळनेर -  मुंबई येथील अमर हिंद मंडळाच्या अत्यंत नावाजलेल्या कै.उमेश शेनॉय स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत युवावक्ता सारांश धनंजय सोनार हा प्रथम क्रमांक मिळवून यंदाचा विजेता ठरला. 'हिमालय वितळतोय,नद्या आटताहेत' या विषयावर लक्षवेधी मांडणी करणारा सारांश हा स्पर्धेच्या अमृत महोत्सवी वर्षाचा विजेता ठरला हे विशेष.
              अर्थतज्ज्ञ प्रा. विनायक कुलकर्णी,प्रा राधिका इंगळे,सी. ए. अजित जोशी यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. सारांशला संस्थेचे रवींद्र ढवळे,सीमा कोल्हटकर या मान्यवरांच्या हस्ते रोख रु.७०००/- व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले . 
           या स्पर्धेत व्दितीय क्रमांक सातारा येथील सुजित कालंगे यांनी पटकावला.
अभिनंदनाचा वर्षाव
           सातत्याने असंख्य स्पर्धा जिंकणाऱ्या युवा वक्ता सारांश सोनार यांचे प्राचार्या ज्योती राणे, प्रा.नितीन पाटील,डिगंबर महाले, प्रा.डॉ.संदीप नेरकर, प्रा.पराग पाटील, डॉ.जी.एम.पाटील, साने गुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, निबंधक इंद्रवदन सोनवणे, प्रा.डॉ.रमेश माने,उपप्राचार्य उल्हास मोरे, प्राचार्य विजय बहिरम,प्रा.वैभव सबनीस,सचिन खंडारे,रवींद्र विसपुते,शाम सोनार,लिलाचंद विसपुते,पत्रकार संजय सोनार, गणेश खरोटे यांचेसह पत्रकार बांधव व सुवर्णकार समाजाने अभिनंदन करून भावी वाटचालीस सदिच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.