--------------------------------------------------------------
अमळनेर - प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या अमळनेर तालुका उपाध्यक्षपदी श्री प्रदीप शांताराम सोनवणे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष व मंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांचे विचार समाजातील प्रत्येक घटकांपर्यत पोहोचविणे व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत रहाण्यासाठी प्रहार संघटना काम करत आहे. संस्थेच्या राज्य सहखजिनदार अॅड.कविता पवार व शहराध्यक्ष योगेश पवार यांनी प्रदीप सोनवणे यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड केली आहे. श्री सोनवणे हे तालुक्यातील निंभोरा आश्रम शाळेचे मुख्याध्यापक असून अंध,अपंग,निराधार दुर्बल घटकांना शासकीय योजनेचा लाभ मिळावा यासाठी ते कार्यरत असतात. आता संस्थेच्या माध्यमातून अधिकाधिक व्यक्तींना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या निवडीबद्दल प्रदीप सोनवणे यांचे ना.बच्चूभाऊ कडू,मा.आ.डॉ.बी.एस.पाटील, अॅड.कविता पवार,योगेश पवार,श्री व्ही.डी.पाटील,प्रा.डॉ.एम.एच.शिंदे,अॅड.व्ही.आर.पाटील, निंभोरा येथील मा.उपसरपंच समाधान धनगर यांच्यासह आश्रम शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आहे.
