----------------------------------------------------------------
अमळनेर - कोरोनाच्या कालावधीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अमळनेरच्या उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांचा नुकताच महसूल दिनी 'उत्कृष्ट उपविभागीय अधिकारी' पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला. अमळनेर येथे कोरोना आजाराच्या कालावधीत उत्कृष्ट नियोजन,लोकसहभागातून कोविड सेंटर क्षमता वाढवून ऑक्सिजन यंत्रणा उभारणी,मृत्यु दर खाली आणण्यासाठी केलेले प्रयत्न यामुळे जळगावचे जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांनी सीमा अहिरे याना' उत्कृष्ट उपविभागीय अधिकारी' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या कर्मचाऱ्यांचाही केला सन्मान
तसेच अमळनेर उपविभागात चोपड्याचे तहसीलदार राजेश पोळ,अव्वल कारकून भुषण पाटील, एच.यु.सैय्यद,नगावचे मंडळाधिकारी पी.एस.पाटील, निवडणूक लिपिक नितीन ढोकणे,वेळोद्याचे तलाठी
लोकराम हिंगे,शिपाई एकनाथ मैराळे,कोतवाल जितेंद्र तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार संतोष बावणे,पी.एस.धमके,ए.एल.ठाकरे, व्ही.पी.पाटील,एस.आर.गरूडकर,पी.एस.सोनवणे, गणेश महाजन,राजाराम पाटील, शिवाजी कोळी, भिकन गायकवाड,मुकेश शिसोदे यांचा आपल्या विभागात चांगले कार्य केल्याबद्दल प्रांताधिकारी सीमा अहिरे व तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला.

