अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेरतर्फे प्रांताधिकारी व पुरवठा निरीक्षक अधिकारी यांचा सत्कार

अमळनेर - कोवीड -१९ च्या काळात जळगाव जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या अमळनेरच्या उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांना नुकताच महसूल दिनी "सर्वोत्कृष्ट उपविभागीय अधिकारी पुरस्कार" देऊन जिल्हाधिकारी डॉ. 
अभिजित राऊत यांनी सन्मानित केले होते. प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी अमळनेर शहर व परिसरातील विविध प्रकारच्या सेवाभावी संघटना व दानशूर व्यक्तींना सोबत घेऊन रुग्णांना वेळीच बहुमोल मार्गदर्शन केले व ऑक्सिजन पुरविले व कोवीड सेंटरची उभारणी करून रुग्णांच्या सेवेसाठी शासकीय यंत्रणा उत्तम प्रकारे राबविली होती. त्यामुळे मृत्यूदर रोखण्यास त्या यशस्वी झाल्या,आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांनी लौकिकही मिळविला.
           तसेच पुरवठा निरीक्षक श्री संतोष बावणे यांनी तहसिलदार मिलिंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना काळात महसूल विभागात सर्वोत्कृष्ट कार्य जळगाव जिल्ह्यात केलेले आहे.
या दोघा अधिकाऱ्यांच्या कार्याची दखल अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेरने घेतलेली आहे. या प्रसंगाचे औचित्य साधून   त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी ग्राहक पंचायतीच्या अध्यक्षा अॅड. भारती अग्रवाल ,सचिव कपिला मुठे, जिल्हा सायबर व बँकिंग समिती प्रमुख विजय शुक्ला,
ऊर्जा समिती प्रमुख सुनील वाघ, सौ अंजू ढवळे, सौ ज्योती भावसार व जयंतीलाल वानखेडे आदी उपस्थित होते. अशी माहिती जिल्हा सहसंघटक  मकसूद बोहरी कळवितात.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.