शहरातील मूर्तीकार,बँड व डि.जे.मालकांची बैठक
-----------------------------------------------------------------------------
अमळनेर - कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप पूर्णपणे संपलेला नाही.तर आगामी काळातील कोरोनाची संभाव्य परिस्थिती लक्षात घेता अजूनही काळजी घेणे आवश्यक आहे.त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवासाठी शासनाने नियमावली जाहीर केली आहे.या नियमांचे सर्वांनी पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करावी लागेल असे अमळनेरचे पोलीस निरीक्षक यांनी सांगितले. शहरातील मूर्तीकार,बँड व डि.जे.मालक यांच्या बैठकीत त्यांनी विविध सुचना केल्या.
काय आहेत सुचना
गणेश मूर्तीच्या उंचीबाबत निर्देश
आगामी गणेशोत्सव सार्वजनिक व साध्या पध्दतीने साजरा करण्याबाबत शासनाने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार गणेश मूर्तीची उंची घरगुती मूर्तींची जास्तीत जास्त २ फुट तर सार्वजनिक मूर्ती जास्तीत जास्त ४ फुट इतकीच असावी.
मिरवणूका नाहीत,दर्शनाचे नियोजन करावे
स्थापना व विसर्जन मिरवणूका काढता येणार नाहीत. गणपती दर्शनासाठी एकाच वेळी अधिक लोकांची गर्दी मंडपात होणार नाही याचे नियोजन मंडळाने करावे,यासाठी ऑनलाईन दर्शन,फेसबुक लाईव्ह,वेबसाईट या पर्यांयांचा विचार करावा,मास्क,सॅनिटायझरचा वापर,निर्जंतुकीकरण फवारणी व सोशल डिस्टंसींग यासह इतर शासकीय निर्देशांचे पालन करावे. नियमांचे पालन न झाल्यास कायदेशीर कारवाई करावी लागेल. मूर्तीकार,बँड व डि.जे.मालकांनी यांनीही या सुचनांचे पालन करावे असे आवाहन श्री हिरे यांनी केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ४५ जणांविरूध्द नियम १४९ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. गोपनीय शाखेचे पो.ना.डॉ.शरद पाटील,दिपक माळी,हितेश चिंचोरे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.
No comments
Post a Comment