अमळनेर - तालुक्यातील भरवस येथील कै.श्रीराम गबाजी सोनवणे माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण व सत्कार समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विजय सोनवणे होते.

वृक्षारोपण व सत्कार

शाळेच्या प्रांगणात माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पाटील ,तालुका गणित मंडळाचे अध्यक्ष डी.ए.धनगर,विजय सोनवणे यांच्या हस्ते वड ,पिंपळ ,करवंद आदी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संस्थेच्या वतीने संजय पाटील व डी.ए.धनगर यांनी व्ही स्कूल ऍप ऑनलाईन शिक्षणासाठी व्हीडिओ ,शैक्षणिक साहित्य तयार केले तसेच विविध संस्थांवर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

काय म्हणाले प्रमुख अतिथी
श्री संजय पाटील म्हणाले की विद्यार्थ्यांनी पावसाळ्यात वृक्षारोपणासारखे दररोज एक सत्कृत्य करावे , जगाशी स्पर्धा करण्याच्या अपेक्षेने मानसिकता खराब करण्यापेक्षा स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा आगळा वेगळा ठसा उमटवला पाहिजे.

श्री डी. ए. धनगर यांनी गणित व संस्कार मूल्ये यांची सांगड घालून विद्यार्थ्यांनी आनंददायी अध्ययन कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विजय सोनवणे यांनी केले.तर सूत्रसंचालन आर.आर.सोनवणे व आभार मंगला सोनवणे यांनी मानले.
