महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाची कार्यकारिणी जाहीर

Saturday, July 9, 2022

/ by Amalner Headlines
अमळनेर- महाराष्ट्र राज्य  खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाची नवीन कार्यकारिणीची निवड आज  करण्यात आली.यावेळी आशिष पवार यांची अध्यक्ष,अमोल पाटील व सविता पाटील यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.निवडणूक निरीक्षक म्हणून व.ना.महाजन यांनी काम पाहिले.
येथे संपन्न झाली सभा
     समता युवक कल्याण प्राथमिक शाळेत आयोजित केलेल्या सभेत ही निवड करण्यात आली. सभेचे अध्यक्ष साने गुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजीव पाटील हे होते. त्याच्या अध्यक्षतेखाली  महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाची नवीन कार्यकारिणीची निवड आज दि. ९ जुलै रोजी करण्यात आली. 
नवीन कार्यकारिणी
              यावेळी संघटनेचे नूतन अध्यक्ष म्हणून समता युवक प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आशिष पवार,उपाध्यक्ष म्हणून अनिल अंबर पाटील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अमोल पाटील, भगिनी मंडळाची प्राथमिक शाळेच्या सविता पाटील तर सचिवपदी सानेगुरुजी विद्यालयाचे स्वप्नील पाटील यांची  नियुक्ती करण्यात आली. लक्ष्मण पाटील,अनिस खाटीक यांची सहसचिव,कोषाध्यक्ष मनोहर पाटील,प्रसिद्धी प्रमुख महेंद्र रामोसे,हिशोब तपासनीस म्हणून हितेश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या पदाधिका-यांची होती उपस्थिती
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हेमंत पाटील,जिल्हा कार्यकारिणी सह सचिव मनोज पाटील,फय्याज शेख,जयेश शिरसाठ,किशोर बडगुजर,अजय भामरे,
आनंदा पाटील,बापूराव ठाकरे आदी उपस्थित होते.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines