जी एस हायकुल येथे पालक शिक्षक सभा संपन्न

नवीन कार्यकारिणीची करण्यात आली निवड
अमळनेर- येथील खा. शि. मंडळाच्या जी.एस.हायस्कूल येथे पालक शिक्षक सभा संपन्न झाली असून सन २०२२-२३ शैक्षणिक वर्षासाठी कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
    यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डी.एच.ठाकूर,पर्यवेक्षक बी.एस.
पाटील,आर.एल.माळी, जेष्ठ शिक्षक ए.डी.भदाणे,एस.बी.निकम व्यासपीठावर उपस्थित होते.शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक डी.एच.ठाकूर,पर्यवेक्षक बी.एस.पाटील,आर.जे.पाटील यांनी मार्गदर्शन केले तर पालकांमधून दिनेश नाईक यांनी सूचना मांडल्या.यावेळी पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी पालकांमधून धनंजय जोशी यांची एकमताने निवड करण्यात आली.
नवीन पदाधिकारी निवड
    शिक्षक पालक शिक्षक संघाची सन २०२२-२३ शैक्षणिक वर्षाची नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.यात पुरुष पालकांमधून धनंजय जोशी,दिनेश नाईक,शिवाजी चौधरी, अशोक मराठे,भास्कर चौधरी, विक्रम पाटील यांची तर महिला पालकांमधून दीपाली शिंपी,सविता चौधरी, ज्योत्स्ना चौधरी,कल्पना सूर्यवंशी, रेखा भावसार,राणी पाटील यांची पालकांमधून निवड करण्यात आली.
         सभेचे सूत्रसंचालन एम.ए.पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल पाटील यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.