प्रत्येक घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय देण्याचे निस्पृह कार्य, आता प्रभागाचा कायापालट करण्याचा बांधलाय चंग
*अमळनेर* - : समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी जनतेची लढाई लढत पत्रकारितेच्या माध्यमातून गेल्या एक तपापासून न्याय देण्याचे निस्पृह कार्य करणार्या दैनिक ‘आजलग’च्या संपादक स्नेहल गौतम बिर्हाडे यांनी अमळनेर नगर परिषदेच्या प्रभाग २ चा कायापालट करण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी त्यांनी प्रभाग २ (अ) मध्ये अनुसूचित जाती महिला राखीव या प्रवर्गातून पालिका निवडणूक लढविण्याचा निर्धार लोक आग्रहास्तव केलेला आहे.
स्नेहल या शांत,संयमी, उच्चविद्याविभूषित,तरूण तडफदार व स्वतः निर्णयक्षम आहेत. त्यांचा सिद्धार्थ चौक, गांधलीपूरा येथे रहिवास असून स्थानिक रहिवाशी असल्यामुळे त्यांना सानेनगर, तांबेपूरा, जपान जीन, मेहतर कॉलनी यासह प्रभागातील सर्व परिसराच्या समस्यांची जाण आहे. या समस्या कश्या सोडवता येतील याचेही आकलन आहे. त्या जातपात मानत नाहीत. परोपकार आणि कोणाच्याही दु:खात स्वतःहून मदतीला धावून जाण्याचा त्यांचा स्वभाव आहे. केवळ नगरपालिकाच नाही तर तहसील, प्रांत, आरोग्य, शिक्षण अशा कोणत्याही क्षेत्रात कोणाची काही अडचण असेल,कुठे अडवणूक, पिळवणूक होत असेल तर ती सोडविण्यासाठी त्या नेहमीच तत्पर असतात. वेळप्रसंगी गोरगरीब आणि गरजुंसाठी पदरमोडही करतात. पत्रकारितेसह सामाजिक कार्यात त्यांना त्यांचे पती गौतम प्रकाश बिर्हाडे यांचे मोलाचे योगदान आहे. सहकार्याची भावना असल्याने त्यांचा दांडगा लोकसंपर्क आहे. पद, प्रतिष्ठा व पैसा प्राप्त करणे हे त्यांचे ध्येय नाही. लोकांची सेवा हे उद्दिष्ठ आणि लोकांच्या समस्या तात्काळ दूर करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न त्यांचे असणार आहेत व समस्या दूर सारण्याची धमकही त्यांच्यात आहे. त्यामुळे प्रभाग २ (अ) मधील मतदार बंधूभगिनी, नवमतदार तरूण तरूणी उच्चविद्याविभूषित उमेदवार स्नेहल गौतम बिर्हाडे यांना आपल्या सेवेची संधी देतील याची खात्री आहे. त्यांच्या रूपाने कार्यक्षम, हुशार, प्रभागाचा कायापालट करत सर्व समाज घटकांना समान न्याय देणारा नगरसेवक प्रभागाला मिळेल अशी आशा आहे.
No comments
Post a Comment