अमळनेर - येथील रोटरी क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदभार समारंभ दि. १ जुलै रोजी रोटरी हॉल येथे झाला. नूतन अध्यक्ष म्हणून रो.किर्तीकुमार कोठारी, तर सचिव म्हणून रो.ताहा बुकवाला यांनी पदभार सांभाळला. मावळते अध्यक्ष रो.वृषभ पारख व सचिव रो.प्रतीक जैन यांनी अमळनेर रोटरी क्लबच्या मागील वर्षातील विविध प्रोजेक्टची माहिती दिली,
--------------------------------------------------
मागील वर्षातील कामाचा आढावा
नवीन पदाधिकारी निवड बैठकीत अध्यक्ष रो.वृषभ पारख म्हणाले की, रोटरी या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून समाज विधायक कामे करत आली. परिपूर्ण अमळनेरचे आश्वासक पाऊल पुढे पडते आहे. पक्ष व राजकारण विरहित ही संघटना असल्यानेच विविध क्षेत्रातील नागरिक यात सहभागी होत आहेत. सर्व रोटरी सदस्यांचे आभार मानले.
रो.प्रतीक जैन म्हणाले, मला संस्थेचे शाखा सचिवपदी काम करण्याची संधी मिळाली. सर्वांना समवेत घेत चांगले काम करता आले याचे समाधान आहे.
नवीन कार्यकारिणी निवड
या सभेत रोटरी क्लब अमळनेरची या वर्षासाठी २१ जणांची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली, रोटरी जिल्हा (डिस्ट्रिक ३०३० नाशिक ते नागपूर) कार्यकारिणीत अमळनेर रोटरी क्लबच्या ६ सदस्यांची निवड झाली. या वेळी रो.अजय केले यांनी नवीन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. रो.प्रतीक जैन यांनी आभार मानले.
काय म्हणाले नवनिर्वाचित अध्यक्ष
नवनिर्वाचित अध्यक्ष रो.किर्तीकुमार कोठारी यांनी येणाऱ्या वर्षात शैक्षणिक मेळावा, शेतकरी मेळावा, वृक्षारोपण, वैद्यकीय शिबिरे, योग दिवस, गरजू व्यक्तींना कपडे वाटप, एड्स प्रोटीन किट, सवलतीमध्ये कॅटरॅक्ट, शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा, कौशल्य विकास, बाल व माता संगोपन सहाय्य प्रकल्प आदी महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवले जातील असे सांगितले.
या कार्यक्रमास सर्व सभासदांनी सहकार्य केले अशी माहिती रोटरी क्लब पी.आर.ओ रो.आशिष चौधरी यांनी दिली.


