चोरी केलेला मुद्देमाल व रोख रक्कमेसह दोन आरोपी गजाआड

अमळनेर येथील हॉटेल भगवती मधील चोरी प्रकरणी पोलीसांची कारवाई

अमळनेर - येथील चोपडा रोड वरील हॉटेल भगवती येथे रोख रक्कमेसह मुद्देमाल चोरून नेणा-या दोन जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या कडून रोख रक्कम,मुद्देमाल व अजून एक चोरीची मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.

          याबाबतची अधिक माहिती अशी की,अमळनेर शहरातील चोपडा रोड वरील हॉटेल भगवती येथे दि.१२ रोजी रात्री ते १३ रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी खिडकीचे गज तोडून दुकानात प्रवेश केला. या चोरट्यांनी ५४ हजार २२५ रुपये रोख रक्कम,सीसीटीव्ही डिव्हीआर व विदेशी कंपनीच्या दारूच्या बाटल्या घेऊन पळ काढला. याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. 
         पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार पुरूषोत्तम पाटील व पोलीस पथकाने

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.