अमळनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल नंदवाळकर सेवानिवृत्त

Monday, September 30, 2024

/ by Amalner Headlines
सहकारी मित्र परिवार आज काढणार बग्गीतून मिरवणूक


     अमळनेर - आपल्या सेवेने आणि कर्तुत्वाने सर्वांच्याच ह्रदयात स्थान मिळवणारे अमळनेरचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री सुनील नंदवाळकर  हे दीर्घ सेवेतून काल दिनांक ३० सप्टेंबर रोजी निवृत्त झाले. त्यांनी आपल्या सोबतच्या सहकारी पोलिसांना आपलेसे केले. अमळनेरकरांच्या सुरक्षेसाठी, कायदा आणि सुव्यवस्थेसाठी तसेच शांत अमळनेरसाठी प्रयत्न केले. प्रेमळ आणि वेळप्रसंगी कठोर भूमिका घेऊन त्यांनी अल्पावधीतच आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. म्हणूनच त्यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्या निमित्त काल पैलाड पासून बग्गी वरून भव्य मिरवणूक काढण्यात येणार होती.मात्र जळगाव,एरंडोल , पारोळा,अमळनेर या पोलीस स्टेशनला त्यांचा निरोप समारंभ करण्यासाठी स्थानिक पोलीस बांधवांचा व कर्मचाऱ्यांचा आग्रह असल्याने बग्गी मिरवणूक वेळेवर काढणे शक्य नव्हते. त्यामुळे आज दिनांक १ ऑक्टोबर रोजी सकाळी ०९:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह ते बन्सीलाल पॅलेस पर्यंत बग्गी मिरवणूक काढण्यात येणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहभागी व्हावे असे आवाहन अमळनेर तालुका नागरी सत्कार समिती यांनी केले आहे.
-----------------------------------

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines