अमळनेर -* येथील स्टेशन रोडवरील मुठे चाळ,मिल चाळ भागातील श्री पंच देवता मारूती मंदिर येथे गुरूवार दिनांक २२ जानेवारी रोजी गणेश जयंतीनिमित्त गणेश याग आयोजित करण्यात आला आहे.
असे आहे नियोजन
श्री पंचदेवता मारूती मंदिरात दरवर्षी माघ शुध्द चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश जयंतीचा उत्सव साजरा करण्यात येतो. या मुहूर्तावर श्री गणेशाचे दर्शन घेणे लाभदायक मानले जाते. यावर्षी २२ जानेवारी रोजी गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी ९ वाजता गणेश याग (हवन पूजा),सायंकाळी ७ वाजता महाआरती व ७:३० वाजता तिर्थप्रसाद अशा कार्यक्रमांचे आयोजन उत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.
भाविकांचे मिळतेय सहकार्य
या कार्यक्रमास मुठे चाळ,मिल चाळ भागातील रहिवासी तसेच छ.शिवाजी महाराज व्यायाम शाळा,श्री पंचदेवता महादेव मंदीर,परांजपे चाळ व सेवेकरी मित्र मंडळ यांचे सहकार्य लाभत आहे. भाविकांनी दर्शन व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
