अमळनेर पोलीस ठाण्यात आढावा भेटीदरम्यान तत्कालीन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव मा. श्री. अशोक नखाते यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी जळगाव जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी सुरेश जाधव यांच्यासोबत विविध प्रशासकीय बाबींवर चर्चा करण्यात आली.
अशोक नखाते यांचा सत्कार
सदिच्छा भेटीदरम्यान अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांचा प्रशासकीय अधिकारी सुरेश जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच प्रशासकीय अधिकारी सुरेश जाधव यांचा उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) विनायक कोते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रशासकीय विषयांवर चर्चा
या भेटीत पोलीस प्रशासन व होमगार्ड विभागाच्या कामकाजासह विविध प्रशासकीय बाबींवर चर्चा झाली. दोन्ही विभागांमध्ये अधिक चांगला समन्वय राहण्यासाठी आवश्यक बाबींवर यावेळी विचारविनिमय करण्यात आला.
पोलीस व होमगार्ड अधिकारी उपस्थित
याप्रसंगी अमळनेरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय निकम, होमगार्डचे अमळनेर तालुका समादेशक गोपाल वना पाटील, कंपनी नायक अरुण नेरकर, वरिष्ठ पलटण नायक रविंद्र ठाकूर, तसेच जळगाव PTC येथील कैलास पाटील, कमलेश वानखेडे यांच्यासह पोलीस व होमगार्ड विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
समन्वयाला मिळणार बळ
या सदिच्छा भेटीमुळे पोलीस प्रशासन आणि होमगार्ड विभागातील समन्वय अधिक दृढ होण्यास मदत होणार असल्याचे उपस्थितांनी नमूद केले. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या भेटीचे स्वागत केले.

