महात्मा फुले स्मृती दिन शिक्षक दिवस म्हणून साजरा करा ओबीसी शिक्षक असोसिएशनचे गट शिक्षणाधिकारी यांना निवेदन

Wednesday, November 27, 2019

/ by Amalner Headlines

अमळनेर - 
महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृतिदिन दि.२८ नोव्हेंबर हा शिक्षक दिवस म्हणून साजरा व्हावा यासाठी नुकतेच ओबीसी शिक्षक पालक विकास असोसिएशन शाखा जळगाव यांच्या वतीने गटशिक्षणाधिकारी आर.डी.महाजन यांना निवेदन देण्यात आले.
       निवेदनात म्हटले आहे की २८ नोव्हेंबर हा दिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी ओबीसी असोसिएशनने यापूर्वी केली असून राज्याध्यक्ष विलासराव पाटील यांनी शासन स्तरावर पत्रव्यवहार केला आहे. शिक्षक दिन हा चारित्र्यसंपन्न व आदर्श शिक्षकांचे गुण असणाऱ्या व्यक्तीच्या नावाने साजरा केला पाहिजे. महात्मा फुले यांचा त्याग आणि बहुजनांच्या कल्याणासाठी केलेले कार्य सर्वश्रुत आहे डॉक्टर राधाकृष्णन यांच्या जन्माच्या चाळीस वर्ष अगोदर महात्मा फुले यांनी मुलींची शाळा पुण्यात सुरू केली.१९ ऑक्टोबर १८८२रोजी हंटर कमिशन समोर बहुजनांच्या मुलांना बारा वर्षापर्यंत प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत देण्याची मागणी करणारे महात्मा फुले होते, म्हणून महात्मा फुले यांचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिवस आहे त्यादिवशी तालुक्यातील सर्व शाळांना पत्र काढून आदेश आदेश द्यावे अशी मागणी ओबीसी शिक्षक असोसिएशनचे राज्याध्यक्ष विलासराव पाटील, जळगाव जिल्हा अध्यक्ष ईश्वर महाजन, तालुका अध्यक्ष डी.ए. सोनवणे, मुख्याध्यापक संघटनेचे तालुकाध्यक्ष  माजी तालुकाध्यक्ष व नाशिक बोर्ड सदस्य प्रकाश पाटील, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एम.ए.पाटील ,पक्षीमित्र अश्विन पाटील, जिल्हा कार्यकारणी सदस्य पी.एस विंचुरकर, ज्येष्ठ सल्लागार दशरथ लांडगे, शिक्षक सेनेचे तालुकाध्यक्ष संदीप बोरसे व पदाधिकारी यांच्या पत्रकावर सह्या आहेत.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines