अमळनेरात पोलीसांचा रूट मार्च सदैव सज्ज असल्याचा दिला संदेश

Tuesday, November 26, 2019

/ by Amalner Headlines

अमळनेर - येथील पोलीस दलाचा अमळनेर शहरातील संमिश्र वस्तीतून पोलीस रूट मार्च घेण्यात आला.शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दल सदैव सज्ज असल्याचा संदेश एका अर्थाने या रूट मार्चमधून देण्यात आला. यात १२ अधिकारी, १८४ कर्मचारी सहभागी झाले होते.   त्यात प्रामुख्याने पोलीस निरीक्षक अंबादास मोरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक सदगीर,सहाय्यक पोलीस निरीक्षक ढोबळे, उपनिरीक्षक माळी, गोपनीय अंमलदार शरद पाटील, दीपक माळी, रवी पाटील, भूषण बाविस्कर, मिलिंद भामरे व ईश्वर सोनवणे तसेच रॅपिड ऍक्शन फोर्सचे ८ अधिकारी,६३ कर्मचारी, आरसीपीचे ३२, सीआर स्टर्किंग फोर्सचे ३२, होमगार्डचे १२ व पोलीस स्टेशनचे ३५ कर्मचारी व २ अधिकारी असे एकूण १२ अधिकारी व१८४ कर्मचारी सहभागी झाले होते.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines