अमळनेर (प्रतिनिधी) आमदार अनिल पाटील यांनी जळगाव येथे जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांचा सन्मानचिन्ह व मार्गदर्शिका भेट देण्यात आली. त्यांनी कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा करून विविध योजनांची माहिती जाणून घेतली.
आमदार अनिल पाटील यांनी विजयी झाल्यानंतर प्रथमच कृषी कार्यालयाला भेट दिली असता जळगाव कृषि कार्यालयाकडून सन्मान चिन्ह व मार्गदर्शिका पुस्तक भेट देऊन गौरव करण्यात आला. यावेळी कृषी तंत्र अधिकारी कावेरी राजपूत, कृषी अधिकारी संजय पवार, कृषी सहाय्यक निलेश वानखेडे, सुनिल पाटील, स्वप्निल पवार, वरीष्ठ लिपिक प्रसाद पुराणिक, लिपिक दिपक बडगुजर, जलयुक्त शिवारचे तंत्र अधिकारी आकाश पाटील, तंत्र सहाय्यक दिपक भांडारकर, कल्पेश महोरकर, प्रा. सुभाष सुकलाल पाटील उपस्थित होते.
आमदार पाटील यांनी जळगाव कृषि कार्यालयास सदिच्छा भेट देऊन अधिकाऱ्यांशी केली चर्चा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments
Post a Comment