शंभर टक्के अमळनेर उजळणार तरी कधी शहरात पथदिवे दिव्यांची लागलीय वाट, बऱ्याच प्रभागात बहुसंख्य पथदिवे बंद,अंधाराचे सामाज्य, स्मशान भूमीतही एकच दिवा

Friday, November 8, 2019

/ by Amalner Headlines


अमळनेर प्रतिनिधी- येथील नगरपरिषदेत  नगराध्यक्षा सौ पुष्पलता पाटील व माजी आ. कृषीभूषण  साहेबराव पाटील  यांच्यासारखे क्रियाशील नेतृत्व असतांना प्रत्येक प्रभागात पथ दिव्यांची अवस्था मात्र अतिशय बिकट झाली असून अनेक भागात रात्रीच्या सुमारास अंधाराचे सामाज्य निर्माण होत आहे. यामुळे नगरसेवकांसह नागरिक संतप्त भावना व्यक्त करीत असून शहर 100% उजळलेले दिसणार तरी कधी असा सवाल या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. गेल्या वर्षभरा पासून पथ दिव्यांची  हीच परिस्थिती असून प्रत्येक दिवशी शहरातील किमान किमान 20 ते 25 टक्के पथदिवे बंद राहणारच हे समीकरण च  झाल्याचाआरोप आहे. नगराध्यक्षा सौ.  पुष्पलता पाटील आणि कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी सर्वाधिक लक्ष स्वच्छता आणि पाणी पुरवठयाकडे घातल्याने या दोन्ही नागरी सुविधांच्या बाबतीत नागरिक अत्यंत समाधानी आहेत. मात्र आता पथदिव्यांच्या समस्येकडे त्यांनी नजर वळविण्याची गरज असून ही दखल त्यांनी न घेतल्यास अजून वाईट स्थिती निर्माण होणार आहे. पालीकेने पथ दिव्यांचा ठेका पुणे येथील कंपनीला दिल्याची माहिती असून संबधित ठेकेदार डोळ्यांना  कधी दिसलाही नसल्याची ओरड नगरसेवकांमध्ये आहे  सगळा प्रभागात प्रथम दिवे बंद असल्याची  तक्रार देऊनही काम झाले नाही व दिवाळीला  अंधार असल्याने  नागरिकांची दिवाळी अंधारात गेल्याची खंत व्यक्त केली आहे.या  तक्रारीवर अजूनही काहीच कारवाई झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले  सिंधी कॉलनी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सतत पंचवीस ते तीस पथदिवे बंद राहत असून या  नागरिक सुद्धा वारंवार तक्रार करुन  अक्षरक्ष: टाळले आहेत तर हीच सगळीकडे परिस्थिती आहे.

 सदर बाबी पाहता संबधित ठेकेदार केवळ पैसे कमवित असून त्या मोबदल्यात काम शून्य आहे.तरी कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा पुष्पलता पाटील आणि मुख्यअधिकारी शोभा बाविस्कर आणि विशेष करून कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी लक्ष घालून ठेकेदारास समज द्यावी आणि पक्ष दिव्यांची परिस्थिती सुधारावी ही मागणी होत आहे.
 ठेकेदार बदल्याची गरज-पुण्याच्या कंपनीला प्रथ  दिव्यांचे ठेका दिल्यापासूनच या पथ दिव्यांचे बारा वाजल्याचा आरोप नगरसेवक आणि काही पालिका कर्मचारी खाजगांत करीत आहेत. यावर ठेकेदार बदलणे हाच पर्याय असल्याचे काहींचे म्हणणे आहे.
 ठेकेदारकडे कर्मचाऱ्यांचीही उणीव- संबंधित ठेकेदार कर्मचार्‍यांच्या बाबतीत देखील  अपूर्ण असल्याचे बोलले जात असून कर्मचाऱ्यांना पुरेसा मोबदला आणि सुरक्षा   प्रदान होत  नसल्याने ही परिस्थिती असल्याचे सांगितले जात आहे. काही महिन्यांपूर्वी याच  कंपनीच्या एका खाजगी कर्मचाऱ्याच्या श्रर्दा नगर येथे काम करीत असतांना  प्रथ दिव्यावरून पडून मृत्यू झाला होता. त्या कर्मचाऱ्याचा कोणताही विमा काढण्यात आला नव्हता जी कंपनी आपली काळजी घेत नाही आणि पुरेसा मोबदला देखील देत नाही अशा कंपनीत काम कशासाठी करावी अशी मानसिकता कर्मचाऱ्यांची झाल्यानेच ठेकेदाराकडे कर्मचाऱ्यांची कमतरता असून यामुळे  काम प्रलंबित राहत असल्याची माहिती मिळाली आहे 
नगरपरिषदेचे अधिकारी प्रशांत ठाकूर-आठ दिवसाच्या आत अमळनेर शहराचे प्रथ दिवे  चालू करण्यात येईल ? हे आसोसन दिले  अमळनेर हेडलाईन्स चे उपसंपादक शी बोलताना सांगितले

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines