अमळनेर - शासकीय नोकरीत दि.१नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना परिभाषित अशंदान योजना लागू करण्यात आली. या योजने अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा दहा टक्के हिस्सा शासन या योजनेत कपात करते.पण गेल्या १४ वर्षापासून होणाऱ्या कपातीचा शासन हिस्सा व व्याज यासंदर्भात कोणत्याही प्रकारचा हिशोब कर्मचाऱ्यांना प्राप्त होत नाही. त्यात ही योजना राष्ट्रीय निवृत्ती योजनेत समाविष्ट करण्याचा आदेश १९ ऑगस्ट २०१९ रोजी काढण्यात आला. पण त्याआधी कर्मचाऱ्यांना हिशोब द्यावा यासंदर्भात अमळनेर तालुका जुनी पेन्शन हक्क संघटनेचे वतीने अमळनेर पं.स.चे गटविकास अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी यांना निवेदन देण्यात आले, यावेळी संघटनेचे राज्य विश्वस्त श्री कुणाल पवार, तालुकाध्यक्ष श्री सुशिल भदाणे, सानेगुरुजी पतसंस्थेचे संचालक श्री तुषार पाटील,शिक्षक भारतीचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री आर जे पाटील, प्राथमिक शिक्षक संघाचे श्री राहुल पाटील,श्री विनोद पाटील,राष्ट्रवादी शिक्षक सेलचे मिडिया प्रमुख श्री राहुल दिलीप पाटील,श्री उमाकांत हिरे,श्री पवन पाटील,श्री नितीन भोई,श्री चंद्रशेखर पाटील,श्री डी ई पाटील,श्री महेंद्र रत्नपारखी,श्री रोहित तेले,श्री हितेश पाटील, श्रीआशिष पवार, श्रीमती पाकिजा पिंजारी,श्री अरविंद बाविस्कर यांचेसह तालुक्यातील सर्व सघटनांचे पदाधिकारी व शिक्षक बांधव उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments
Post a Comment