बालकांच्या न्याय हक्कासाठी कायद्यांचे संरक्षण पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांचे मार्गदर्शन

Thursday, November 21, 2019

/ by Amalner Headlines

अमळनेर - 
शासनाने लहान बालकांच्या न्याय हक्कासाठी कायद्यांचे संरक्षण दिले असून बालकांनाही जगण्याचा अधिकार आहे. लहान मुलांनीआपल्या हक्काबाबत जागृत रहावे असे मार्गदर्शन अमळनेरचे पोलिस निरीक्षक श्री अंबादास मोरे यांनी केले. अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी नुतन माध्यमिक विद्यालय व साने गुरुजी कन्या हायस्कुल अमळनेर या शाळेतील विद्यार्थ्यांना बाल हक्क दिनाच्या निमित्ताने पोलीस निरीक्षक श्री.अंबादास मोरे यांनी  *बालहक्क व संरक्षण* या विषयावर मार्गदर्शन केले.श्री मोरे पुढे म्हणाले की,गर्भलिंग तपासणी, जन्मानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या लसीकरण,शिक्षणाचा हक्क-कोणतेही मुल शिक्षणापासून वंचित राहू नये , त्याला त्याचे मत मांडण्याचा अधिकार देण्यात आला आहे-लेखन स्वातंत्र्य,भाषण स्वातंत्र्य,लहान मुलांवर होणारे अत्याचार-घरगुती हिंसा असेल,समाजकंटकांकडून होणारा त्रास, बालमजूरीत 14 वर्षा आतील बालक बालमजूर ठरू शकतो.तो ज्या मालकाकडे काम करत असेल त्याला 10 महिने शिक्षा व 20हजार रुपये दंड शिक्षा सुनावली जाते ,बालविवाह- मुलगा 21वर्षाखालील,मुलगी18 वर्षाखालील असेल तर बालविवाह ठरू शकतो, या साठी2वर्ष शिक्षा व 1 लाखापर्यंत दंड होवू शकतो, पोस्को -कायद्याअंतर्गत जवळचेच नातेवाईक स्पर्श करून अत्याचार करतात अशा वेळेस मुलींनी जागृत राहून आळा घातला पाहिजे,दवाखान्यात किंवा इतर ठिकाणी अर्भक सोडून जातात त्यांनाही सांभाळण्याची जबाबदारी पोलीस स्वीकारतात ,अशा प्रकारच्या गुन्हेगारींना पोस्को कायद्याअंतर्गत कोणत्याही प्रकारचा जामीन मंजूर केला जात नाही,जन्मठेपेची शिक्षा होते.
तसेच आपल्यासमोर शेजारी एखादा अनोळखी व्यक्ती बंद घराचे लाँक उघडत असेल तर वेळीच पोलीसांना कळवा असे आवाहनही श्री मोरे यांनी केले. 

 सपोनि श्री.शरद पाटील यांनी पोलीसांविषयी आपल्या मनात असणारी भीती दूर करुन ते आपले मित्रच आहेत. तुमच्यावर काही अत्याचार झाला तर लगेच पोलीसांना कळवा असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात श्री.संदीप घोरपडे यांनी बालहक्क संरक्षण या कायद्याअंतर्गत तुम्हाला न्याय मागण्याचा अधिकार आहे, तो तुम्ही मागावा.असे मत व्यक्त केले. 
         कार्यक्रमाला श्री.संदीप बी. घोरपडे,श्री.एस.डी.देशमुख,श्रीमती अनिता डी.बोरसे ,विलास चौधरी,श्री.सुनील पाटील,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी,उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री.डी.ए.धनगर तर आभार श्री.एस.डी.देशमुख यांनी मानले.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines