अमळनेर - येथील स्टेशन रोडवर असलेल्या स्वामी नारायण मंदीराजवळील चौकाचे " श्री स्वामी नारायण चौक " असे नामकरण १५० संतांच्या उपस्थितीत आज करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांसह हजारो भाविक भक्तांची उपस्थिती होती.
विश्ववंदनीय प्रकट ब्रह्मस्वरूप परम पूज्य महंत स्वामी महाराज यांच्या आज्ञेनुसार खान्देशात पंचतीर्थ यात्रा संपन्न करण्यासाठी सारंगपूर येथील प्रशिक्षित १५० युवा संतांचे अमळनेरात जोरदार स्वागत करण्यात येऊन भव्यदिव्य असे स्वामीनारायण चौकाचे उद्घाटन भगवंताचे स्तोत्र आरती पठणाने करण्यात आले .स्वामीनारायण चौकाचे नामकरण अमळनेर नगर परिषदेच्या सौजन्याने करण्यात आले. यासाठी लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.पुष्पलता पाटील यांचे सहकार्य लाभले .याप्रसंगी उपस्थित १५० संतांनी भगवंतांचे दर्शन घेऊन साष्टांग दंडवत केले .मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ संतांचे पुष्पवृष्टी द्वारे स्वागत करण्यात येत होते .योगीस्नेह स्वामी, संतवृंद तथा अमळनेरचे माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील, बजरंग अग्रवाल यांनी भगवंतांची आरती केली. या कार्यक्रमाला दलित समाजाचे ज्येष्ठ नेते रामभाऊ संदांशिव, नगरसेवक मनोज पाटील , नगरसेवक निशांत अग्रवाल, योगेश मुंदडा ,विक्रांत पाटील ,प्रवीण सोनी, प्रदीप अग्रवाल, पंकज मुंदडा, प्रसाद शर्मा ,जितेंद्र जैन,आकाश माहेश्वरी, नीरज अग्रवाल यांचीही या उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती होती.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शामकांत बागड, प्रितम मणियार, अतुल सोनी, अमरीश अग्रवाल ,हरिकृष्ण सोनी ,जगदीश चौधरी, चंद्रकांत लोहार, चंद्रकांत महाजन, रमेश कुंभार,किशोर सोनी, नरेंद्र सोनी, अनिल पाटील, चंद्रकांत वाणी, रवी चौधरी, आकाश माहेश्वरी, राकेश माहेश्वरी,आदींसह महिला मंडळ,युवक-युवती मंडळ, सत्संग मंडळाने परिश्रम घेतले.
No comments
Post a Comment