श्रीमंत प्रतापशेठ यांची १४० वी जयंती साजरी प्रताप तत्वज्ञान केंद्रात आठवणींना उजाळा

Wednesday, December 11, 2019

/ by Amalner Headlines
अमळनेर -
येथील दानशुर व्यक्तिमत्व,शिक्षण,उद्योग,सेवा व अध्यात्म अशा विविधांगी क्षेत्रात अविस्मरणीय कार्य करणारे श्रीमंत प्रतापशेठ यांची आज १४० वी जयंती प्रताप तत्वज्ञान केंद्रात साजरी करण्यात आली. 
  प्रताप तत्वज्ञान केंद्राचे मानद संचालक प्राचार्य डॉ.एस.आर.चौधरी व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. तत्वज्ञान विषयाचे अभ्यासक व चिंतक असलेले प्रतापशेठ यांनी तत्वज्ञान केंद्राची स्थापना केली. अनेक अभ्यासक शेठजींच्या दातृत्वामुळे या केंद्रात अभ्यासासाठी येऊन गेले.त्याचप्रमाणे शैक्षणिक,सामाजिक,आरोग्य,व
अध्यात्मिक असे वेगवेगळे अजरामर कार्य प्रतापशेठ यांनी केले अशा आठवणींना उजाळा देण्यात आला. याप्रसंगी सिनेट सदस्य दिनेश नाईक,प्रा. धर्मसिंह पाटील,प्रा.डॉ.धिरज वैष्णव,प्रा.डॉ.राधिका पाठक,प्रा. प्रमोद चौधरी,पंडीत नाईक,रंजना फालक,युनूस पठाण,गोपाल माळी,अविनाश पाटील आदींचीउपस्थिती होती

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines