अमळनेर - येथील सिंधी कॉलनीजवळील वळण रस्त्यावर आज सायंकाळी भीषण अपघात झाला.चोपड्याहून काही वाहने अमळनेरकडे येतांना समोरून चोपड्याकडे जाणा-या मालवाहू ट्रकने चारही वाहनांना धडक दिल्याने यात सुमारे १२ ते १५लोक जखमी झाले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चोपडा रस्त्यावर सिंधी कॉलनी जवळ अमळनेरकडे जाणा-या वाहनांना त्यात पॅजो रिक्शा, ट्रॅक्टर, कार या वाहनांना (NL-01-AB-4769)या क्रमांकांच्या मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिल्याने सुमारे १२ ते १५ लोक जखमी झाले .त्यात पॅजो रिक्षातील ९ जण जखमी झाले आहेत तसेच अमळनेर येथील रहिवासी व कामतवाडी गांवचे पोलीस पाटील अनिल गायकवाड यांच्या आई ,पत्नी ज्योती गायकवाड, मुलगा साई गायकवाड हे कारमधील जखमींची नावे आहेत त्यांना तात्काळ डॉ.सुमित सुर्यवंशी यांच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काहींना अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मालवाहू ट्रक चालक हा उत्तर प्रदेशचा असून तो दारू पिऊन भरधाव वेगाने वाहन चालवित होता.जखमी झालेले रूग्ण हे नगांव बुद्रुक तर काही अमळनेर येथील आहेत.दरम्यान काही रुग्णांना धुळे येथे तर काहींना अमळनेर येथील खासगी रुग्णालयात तर काहींना अमळनेर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
या अपघातात पॅजो रिक्षातील योगेश रमेश पाटील (वय३५ ) भटाबाई दिलीप पाटील (वय५०) ज्ञानेश्वर विनायक पाटील(वय३८) वंदनाबाई राजाराम पाटील(वय४० ) विनायक कौतिक पाटील (वय८०)राजाराम विनायक पाटील (वय ४० ) सर्व (रा.नगांव बुद्रुक) हे जखमी झालेले आहेत.
No comments
Post a Comment