अमळनेर - हैद्राबाद येथे नुकत्याच झालेल्या डॉ.प्रियंका रेड्डी हत्या प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी व आरोपींना कठोर शासन व्हावे या मागणीसाठी अमळनेर येथे उद्या सायंकाळी ५ वाजता निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. हैदराबाद येथे पुन्हा एक निर्भया प्रकरण घडले असून पिडीतेवर सामूहिक बलात्कार करून निर्दयपणे जाळून खून करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे.महिला व मुलींवर होणाऱ्या ह्या अत्याचाराचा जाहिर निषेध करण्यासाठी व आरोपींना कठोर शासन मिळावे अशी मागणी देशभरातून पुढे येत आहे. अमळनेरातील सर्व संवेदनशील महिला व पुरुषांना आवाहन करण्यात येते की सोमवार दि.२ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह अमळनेर येथे मेणबत्ती घेऊन उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments
Post a Comment