अमळनेर -अत्यंत हलाखीचे जीवन जगणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थीनीं दारिद्र्याच्या जाळ्यात अडकून पडल्या असल्याने त्यांना मदतीचा हात देऊन शैक्षणिक प्रवाहात आणणे नितांत गरजेचे आहे.अंगावर शहारे यावेत असे या वर्गाचे हाल असून या मुलींना शिक्षणासाठी आर्थिक योगदान देण्यासाठी प्रगतीशील समाजाने पुढे आल्यास बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान खऱ्या अर्थाने सार्थकी लागेल.केवळ देखावा करून काहीही साध्य होणार नाही असे परखड मत अमळनेर देना बँकेचे शाखाधिकारी नंदकिशोर वरूडकर यांनी व्यक्त केले. चोपडा येथील कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहात अमळनेर वृक्षवल्ली परिवारातर्फे आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.यावेळी वृक्षवल्ली फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.निलीमा राजेश सोनकुसरे व राजेश सोनकुसरे यांचे सहकार्याने आदिवासी विद्यार्थीनींना ४१ टीफीन बाॅक्स व १० स्टेनलेस स्टीलच्या बादल्या आंघोळ व कपडे धुण्यासाठी वाटप करण्यात आल्या. याशिवाय नाष्टा व खाऊ वाटप करुन विद्यार्थीनींचा आनंद द्विगुणित केला.
कार्यक्रमास मांडळ बॅंक ऑफ बडोदाचे अधिकारी राजेश सोनकुसरे, सौ.रजली वरुडकर, विजया तायडे ( अमरावती ), सुनिता राजेंद्र कासार, सारिका आनंद झंवर, उर्मिला हरिसिंग राजपुरोहित, कोमल दीपक महाजन, वसतीगृह अध्यक्ष महेश शिरसाठ, पत्रकार आत्माराम पाटील, सचिव संजय शिरसाठ, शितल पाटील, जानव्ही संजय पाटील,अधिक्षिका कावेरी कोळी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
No comments
Post a Comment