घर बांधण्यासाठी माहेरुन १० लाख आणण्याचा तगादा पतीसह आठ जणांविरुद्ध अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल

Monday, December 2, 2019

/ by Amalner Headlines

अमळनेर -
विज्ञान व प्रगतीच्या युगात देश खुप पुढे गेला मात्र हुंडा नावाची प्रथा अजून देखील बंद होतांना दिसत  नाही. कितीही शिक्षित असला तरी देखिल तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने हुंडा घेतोच असाच एक प्रकार अमळनेर येथे नुकताच उघडकीस आला आहे. सौ. खुशबू पाटील यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. की त्यांचे पती तसेच सासरच्या लोकांनी हुंडा म्हणून 10 लाख रुपये आपल्या माहेर वरून घेऊन ये असे सांगितले व घराबाहेर काढून दिले. तसेच पती रायसोनी कॉलेज जळगाव येथे प्राध्यापक म्हणून नोकरीत आहे असे खोटे बोलून लग्न केले होते. 
या बाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी सौ. खुशबू सुरेंद्र पाटील (वय ३०)यांचे लग्न सुरेंद्र पाटील रा. खडगाव ता. चोपडा यांच्या सोबत झाले होते. लग्नाच्या वेळेस मी रायसोनी कॉलेज जळगाव येथे प्राध्यापक म्हणून नोकरीला आहे असे खोटे बोलून लग्न केले होते. मात्र लग्ना नंतर ही गोष्ट उघड झाली. लग्न देखील फिर्यादीच्या वडिलांनी मोठ्या धडाक्यात दहा लाख रुपये खर्च करून तसेच मुलीला म्हणजे फिर्यादीला स्त्रीधन म्हणून १८ तोळे सोने,जावयाला ८ तोळे सोने असे तब्बल २६ तोळे सोने दिले होते. मात्र फिर्यादीच्या सासरच्या लोकांनी ते सोने देखील तिच्या कडून घेऊन घेतले. व नंतर घर बांधायला १० लाख रुपये तुझ्या माहेरून घेऊन ये असे सांगत तिला ७ ते ८महिने शारीरिक व मानसिक त्रास दिला व तिला घराच्या बाहेर काढून दिले. या सततच्या त्रासाला कंटाळुन फिर्यादीने अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेतली व पती सुरेंद्र पाटील तसेच इतर सासरच्या ८ जणांविरुद्ध कलम ४९८ (अ) ,३२३,५०४,५०६नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. सुनिल हटकर करीत आहेत.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines