आ.गुलाबराव पाटील यांचे अमळनेरात स्वागत

Monday, December 2, 2019

/ by Amalner Headlines


अमळनेर -
शिवसेना उपनेते,जळगांव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील यांनी आज अमळनेर येथे भेट दिली. त्यांचे  राजभवन येथे स्वागत करण्यात आले. माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, नगरपरिषद मुख्याधिकारी सौ.शोभा बाविस्कर, पोलीस निरीक्षक श्री. अंबादास मोरे, देखरेख संघ सभापती विक्रांत पाटील, कॉंग्रेस शहराध्यक्ष मनोज पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, नगरसेवक बाबू साळुंखे, प्रा. रामकृष्ण पाटील , रविबापू अहिरे,शिरुड, रवी महाराज, हेडावे, सुभाष भोई, पोलीस प्रवीण पाटील, शरद पाटील, दिपक माळी,बाळू  कोठारी, जितू कटारिया, संजय चौधरी प्रशांत ठाकूर आदीसह मान्यवर उपस्थित होते.राज्यात नुकत्याच स्थापन झालेल्या शिवसेना-राष्ट्रवादी- कॉंग्रेस महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेनंतर हा पहिला अमळनेर दौरा होता. तर आगामी मंत्रीमंडळ विस्तारात आ.गुलाबराव पाटील यांना कॅबिनेट मंत्री व जळगावचे पालकमंत्री म्हणून बढती मिळू शकते अशी खात्री आहे.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines