अमळनेर - येथील प्रताप महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे तालुक्यातील अंतुर्ली रंजाने गावात विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन दि. ८ ते १४ डिसेंबर २०१९ दरम्यान करण्यात आले आहे. यात दिनांक आठ रोजी प्रताप विद्यालयाच्या प्राचार्या ज्योती राणे यांच्या अध्यक्षतेखाली व अल्पसंख्याक विद्यार्थी अंतुर्ली रंजाने जि.प. शाळा यांच्या हस्ते उद्घाटन होत असून प्रमुख अतिथी खा. शि.मंडळाचे कार्याध्यक्ष प्रदीप अग्रवाल, जि. प. सदस्य जयश्री पाटील, माजी सरपंच सचिन पाटील, विद्यमान लोकनियुक्त सरपंच शीतल पाटील, विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.नितीन बारी,सिनेट सदस्य दिनेश नाईक, खा.शि.मंडळाचे चिटणीस प्रा. डॉ. ए. बी. जैन,जिल्हा समन्वयक प्रा. विजय मांटे उपस्थित राहणार आहे.
दरम्यान या सात दिवसात विविध बौद्धिक विषयांवर तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत.
तदनंतर दिनांक १४ रोजी सकाळी १०:३०वाजता या शिबिराचे समारोप समारोप खा.शि.मंडळाचे कार्योपाध्यक्ष डॉ. संदेश गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली,प्राचार्य ज्योती राणे व खाशी मंडळ संचालक योगेश मुंदडा, नीरज अग्रवाल, कल्याण पाटील, डॉ. बी. एस. पाटील, जितेंद्र जैन,हरी भिका वाणी,जे. डी. सी. सी.बँक संचालिका तिलोत्तमा पाटील विभागीय संचालक रा.से.यो. प्रा.डॉ.किशोर पाठक यांच्या उपस्थित होणार असून शिबिरास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रताप महाविद्यालयाचे रासेयो विभागा तर्फे करण्यात आले आहे.
No comments
Post a Comment