अमळनेर - ज्याप्रमाणे सर्वच ठिकाणी आठवडे बाजार भरतो तसाच फक्त महिलांचा आठवडे बाजार ही संकल्पना राबवून तालुक्यातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून द्यावे ही संकल्पना पेटेंट झाली असून तळागाळातील महिलांना आपल्या हक्काची बाजारपेठ मिळेल यासाठी शिरीष चौधरी मित्रपरिवार व झेप फौंडेशन संयुक्तपणे प्रयत्नशील असल्याची माहिती माजी आमदार शिरीष चौधरी,जागतिक कीर्तीच्या उद्योजिका रेखा चौधरी व अनिता चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
काही ग्रामीण व शहरी भागातील महिला बचत गटांच्या माध्यमातून उत्कृष्ट उत्पादने बनविली जातात पण त्यांना आपल्या हक्काची बाजारपेठ मिळत नाही.त्यांना आठवड्यातून एक दिवस हक्काची बाजारपेठ मिळावी म्हणून फक्त महिलांचा आठवडे बाजार ही संकल्पना राबविण्यात येणार आहे याचे उद्घाटन दि. २५ डिसेंबर रोजी होत आहे.याबाबत माजी आमदार शिरीष चौधरी व उद्योजिका रेखा चौधरी यांनी माहिती दिली.
No comments
Post a Comment