अमळनेर काँग्रेसच्या वतीने सोनिया गांधी यांचा वाढदिवस साजरा गरीब गरजूंना ब्लॅंकेटस् वाटप

Tuesday, December 10, 2019

/ by Amalner Headlines

अमळनेर -
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षा खा. सोनिया गांधी यांचा वाढदिवस दि.९ डिसेंबर रोजी अमळनेर कॉंग्रेसच्या वतीने साजरा करण्यात आला. गरीब व गरजू नागरिकांना ब्लॅंकेटस् वाटप करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास विधान परिषद सदस्य आ.डॉ.सुधीर तांबे यांची विशेष उपस्थिती होती. 
    कार्यक्रमाच्या सुरूवातीस महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर उन्नाव आणि हैद्राबाद येथील पिडीतांना मेणबत्ती पेटवुन सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष कै.उदय बापू वाघ यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.या कार्यक्रमास  वेळी उघड्यावर झोपणारे गरीब गरजूंना आ.सुधीर तांबे, माजी आमदार साहेबराव पाटील, रामभाऊ अण्णा संदानशिव,जि.प.सदस्या सौ.जयश्री पाटील व मान्यवरांच्या हस्ते ब्लॅंकेटस्  वाटप करण्यात आले.ब्लॅंकेटस् वाटपासाठी प्रा.गरुड सर व प्रा. पाटील सर यांनी विशेष योगदान दिले.आपल्या मनोगतात  आमदार डॉ.तांबे यांनी सर्वांनी    एक संघ राहून पक्ष वाढीसह नवीन तरुण कार्यकर्त्यांची फळी उभारून सोनिया गांधींना खऱ्या अर्थाने वाढदिवसाची भेट द्यावी असे आवाहन केले. माजी आमदार साहेबराव पाटील यांनी  माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात काँग्रेस पक्षातून झाली असे आपल्या मनोगतात व्यक्त केले.
या वेळी माजी नगराध्यक्ष विनोद भैय्या पाटील, जेष्ठ नेते भैय्यासाहेब पाटील,लोटन चौधरी ,गोकुळ पाटील,सुलोचना वाघ,डॉ. अनिल शिंदे,संभाजी लोटन पाटील,श्याम पवार,प्रताप पाटील,सत्तार मास्टर,प्रा.सुभाष जीभाऊ,शेखा मिस्त्री,फयाज पठाण,अहमद पठाण,राजु शेख,शफी पहेलवान, नरेंद्र संदानशिव, जुबेर पठाण,अझर पठाण,तुषार संदानशिव,मयुर पाटील,देवेंद्र महाजन ,मनोज बोरसे,ठाकरे सर,तौसीब तेली,सोमचंद संदानशिव,धोना ब्राह्मणे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्र संचलन मनोज पाटील,प्रास्ताविक मुन्ना शर्मा तर आभार प्रदर्शन अॅड. रज्जाक शेख यांनी केले.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines