संपादक गुरूनामल बठेजा यांनी वाढदिवसानिमित्त केले रक्तदान सर्वच घटकातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा

Tuesday, December 24, 2019

/ by Amalner Headlines
अमळनेर -
येथील सिंधी समाज पंचायतीचे सदस्य,
सामाजिक कार्यकर्ते,संगम ईलेक्ट्रीकल व कुलर्सचे मालक,   संपादक गुरूनामल बठेजा यांचा वाढदिवस आज उत्साहात साजरा करण्यात आला. समाजातील सर्वच घटकातील मान्यवरांनी त्यांचे अभिष्ठचिंतन केले व पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. 
        अमळनेर हेडलाइन्सचे संपादक श्री गुरूनामल बठेजा यांनी वाढदिवसानिमित्त रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली.तसेच कुटुंबिय व मित्र परिवाराने केक कापून वाढदिवस साजरा केला.
वाढदिवस व मंगळवार असे औचित्य साधत सायंकाळी मित्र परिवाराच्या उपस्थितीत येथील  सुप्रसिद्ध मंगळग्रह मंदिरात श्री बठेजा यांच्या हस्ते आरती करण्यात आली.सिंधी समाज बांधव,व्यापारी,शासकीय व पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी,राजकीय व सामाजिक क्षेत्रांतील वेगवेगळ्या संस्था,
संघटना,पक्षाचे लोकप्रतिनिधी,
पदाधिकारी,कार्यकर्ते,पत्रकार बांधव व हितचिंतकांनी प्रत्यक्ष भेटून,फोन अथवा सोशल मिडीयाच्या माध्यमातून अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी भरभरून  शुभेच्छा दिल्या.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines