पक्षीमित्र आश्विन पाटील यांना पर्यावरण क्षेत्रातील कार्यासाठी पुरस्कार श्री अंबरीष टेकडी गृपतर्फे सत्कार संपन्न

Thursday, December 26, 2019

/ by Amalner Headlines
अमळनेर -
येथील पक्षीमित्र आश्विन पाटील यांना पर्यावरण क्षेत्रातील कार्यासाठी नुकताच पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पक्षी प्रेमी शिक्षक  श्री.आश्विन लिलाचंद पाटील यांना त्यांच्या पर्यावरण संवर्धनासंदर्भात केलेल्या कार्याची विशेष दखल घेऊन "जागतिक संविधान व संसदीय संघ ( डब्ल्यूसीपीए ) वर्ल्ड कॉन्स्टिट्यूशन पार्लमेंट असोसिएशन तर्फे " Global Friend of nature Award -2019 " हा पर्यावरण क्षेत्रातील अत्यंत मानाचा पुरस्कार देऊन दि.२३डिसेंबर २०१९ रोजी WCPA चे अध्यक्ष डॉ. ग्लेन मार्टीन यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीरामपूर येथे सन्मानित करण्यात आले.
या निमित्ताने श्री अश्विन पाटील यांचा सत्कार 
 श्री अंबरीष महाराज टेकडी ग्रुप कडून करण्यात आला. यावेळी कार्यक्रमात सत्कार करण्यासाठी पोलिस निरीक्षक श्री. अंबादास मोरे यांच्यासह श्री.अंबरीष महाराज टेकडी ग्रुप चे मावळे उपस्थित होते.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines