प्रा.जयश्री साळुंखे यांनी वंचित घटकांमध्ये साजरा केला आईचा वाढदिवस

अमळनेर-
येथील प्राध्यापिका,सामाजिक कार्यकर्त्या व पत्रकार जयश्री साळुंखे यांनी त्यांच्या मातोश्री व सेवानिवृत्त शिक्षिका ठगुबाई सोनवणे यांचा ७२ वा वाढदिवस नुकताच समाजातील वंचित घटक रेल्वे स्टेशनवर भिक मागून आपला उदरनिर्वाह करणा-या व्यक्तींमध्ये साजरा केला. 
 यावेळी सर्वांना खाद्य पदार्थ वाटप करण्यात आले. स्त्री-पुरूषांना शाल,पॅण्ट-शर्ट,साड्या असे आवश्यक कपडे देण्यात आले. तसेच यावेळी रेल्वे स्टेशनवर केक कापण्यात आला. 
            सौ.ठगुबाई सोनवणे ह्या देखील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहिल्या आहेत शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत प्रा. जयश्री साळुंके यादेखील गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सहभागी आहेत.
आपल्या सृजनशील विचारांनी त्या सामाजिक क्षेत्रात नव नवीन उपक्रम राबवित असतात. हे सर्व कार्य करण्याची प्रेरणा त्यांना आपल्या आईकडून मिळते असे त्यांनी सांगितले
आईनेच स्वकष्टाने अत्यन्त परिश्रमाने आपल्याला ह्या उंची पर्यंत पोहचण्यास मार्गदर्शन केले.स्वतःच्या पायावर उभे राहण्याची,अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची,चारित्र्य क्षम,प्रामाणिक,सत्यवादी राहण्याची प्रेरणा देखील आई कडे पाहूनच मिळते असेही प्रा. साळुंखे यांनी सांगितले. यावेळी नूर खान,सुरेश कांबळे,समाधान मैराळे,सुनिल करंदीकर,सत्तर खान,आत्माराम अहिरे,सचिन चव्हाण इ.उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.