सी.आर.पाटील इंटरनॅशनल स्कूलचे उद्या स्नेहसंमेलन

अमळनेर -
येथील तांबेपूरा भागातील कनिष्क फाऊंडेशन संचलीत सी.आर.पाटील इंटरनॅशनल स्कूलचे उद्या दि.२५ डिसेंबर रोजी द्वितीय वार्षिक  स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. 
      या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन विधान सभा सदस्य आ.अनिल भाईदास पाटील व विधान परिषद सदस्या आ.श्रीमती स्मिता उदय वाघ यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी मा.आ.कृषीभुषण साहेबराव पाटील,नपाच्या नगराध्यक्षा पुष्पलता पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे,पोलीस निरीक्षक अंबादास मोरे,एस.जे.शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकर जाधव, तेजोमय फाऊंडेशनच्या संचालक सीमा जाधव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित रहाणार आहेत. सायंकाळी ५ वाजता स्कूलच्या प्रांगणात होणा-या या कार्यक्रमास विद्यार्थी,पालक व हितचिंतकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष महेश पाटील व प्राचार्य सौ.नुतन पाटील (सभापती,क्रीडा व शिक्षण विभाग न.पा.अमळनेर) यांनी केले आहे.
------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.