अमळनेर - येथील सुभाष चौक भागात मसाला दूध विक्री करणा-या हेमंत दुसाने या दुकानदाराशी दूध घेण्याच्या वादातून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.यावेळी सदर संशयितास हटकल्याने त्याने कर्तव्य बजावत असलेल्या RCP पथकातील पोलीस कर्मचारी मयूर पाटील यांच्यावर दादू धोबी नामक गुंडाने चाकू हल्ला केला. ही घटना शहरात रात्री सुमारे ८:४५ वाजता घडली. या बाबत सविस्तर वृत्त असे की, RCP पथकातील पोलीस कर्मचारी मयूर पाटील हे सुभाष चौक भागात आपले कर्तव्य बजावत असतांना ते जेवणाला जात होते.त्याचवेळी तेथे दुध विक्री दुकानदाराशी सुरू असलेल्या वादात मयुर पाटील यांनी हस्तक्षेप केला.तेव्हा तेथे असणाऱ्या दादू धोबी नामक गुंडाने त्यांच्यावर हल्ला चढवला. हेमंत दुसाने व मयूर पाटील यांच्यावर तीन ठिकाणी चाकूने वार केल्याचे समजते. त्यांच्यावर अमळनेर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेच्या काही मिनिटातच दादू धोबीला API प्रकाश सदगीर ,पोलिस कर्मचारी रवी पाटील, शरद पाटील, दिपक माळी यांनी ताब्यात घेतले आहे.
सदर घटनेनंतर आ.अनिल भाईदास पाटील यांनी रूग्णालयात भेट देऊन विचारपूस केली व पोलीस अधिका-यांशी चर्चा केली.त्यानंतर एसीपी सौरभ अग्रवाल यांनीही भेट देऊन पाहणी केली व पोलीस अधिका-यांना कारवाईबाबत सुचना दिल्या.




