अमळनेर - रेल्वेच्या सुरक्षित प्रवासाच्या दाव्याला आव्हान देणारी घटना नुकतीच अमळनेर येथे घडली आहे. सुरत ते वाराणसी या मार्गावर धावणा-या ताप्ती गंगा एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना धाक दाखवून त्यांच्याकडून पाच मोबाईल, २२ हजार रुपये रोख लांबविल्याची घटना अमळनेर स्थानकावर घडली. यामुळे प्रवाशी भयभीत झाले.प्राथमिक माहितीनुसार, ताप्ती गंगा एक्सप्रेसमध्ये चोरट्यांनी प्रवाशांना धाक दाखवून त्यांच्याकडून पाच मोबाईल लांबविले. तसेच २२ हजार रुपये देखील लांबविले.या घटनेमुळे रेल्वेचा प्रवास सुरक्षित या दाव्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



