अमळनेर - येथील अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी नुतन माध्यमिक विदयालय व साने गुरुजी कन्या हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३ व ४ जानेवारी असे दोन दिवस स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे .
या स्नेहसंमेलन कार्यक्रमाची सुरुवात आज सकाळी बाल आनंद मेळावा या कार्यक्रमाने झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटक अमळनेर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री.संदीप वायाळ व व्यासपीठावरील मान्यवर व्यक्तिंनी साने गुरुजी व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण केले़ .
इतिहास घडवणारी माणसे बोटावर मोजण्याएवढे असतात. त्याच्यात आपले नाव नोंदवा. आग विझवणा-या चिमणी सारखे आपले काम असायला हवे.पुस पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारीक ज्ञानही आपल्याला असायला हवे.नफा -तोटा यांचे ज्ञान आपल्याला या आनंद मेळाव्याच्या स्टाँलच्या माध्यमातून कळत असते.विद्यार्थ्यांनी ध्येय डोळ्यासमोर ठेवून या गोष्टींचा समंजसपणाने विचार करावा. समोरासमोर आव्हाने स्विकारा, स्व ची जाणीव ठेवून अभ्यास करावा.चारित्र्याची किंमत पैश्यात मोजता येत नाही. चारित्र्य संपन्न बना.
-श्री संदीप वायाळ
गट विकास अधिकारी,अमळनेर
श्री संदीप घोरपडे यांनी बाल आनंद मेळावा हा विद्यार्थ्यांच्या मनावरील ताणतणाव दूर व्हावा यासाठी असतो.शालेय जीवनात व्यवहारीक ज्ञान (नफा -तोटा) हा स्व अनुभव विद्यार्थ्यांना या माध्यमातून मिळत असतो.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो अशी माहिती दिली.दुपार सत्रात संस्थेचे अध्यक्ष श्री.हेमकांत पाटील,सचिव श्री.संदीप घोरपडे, श्री.गुणवंतराव पाटील,श्री.अशोक बाविस्कर,
श्री.एस.डी.देशमुख,श्रीमती अनिता बोरसे यांनी नटराज प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले.व सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात केली. या कार्यक्रमात भारूड , नाटिका . देशभक्तिपर,आदिवासी संस्कारीक अशा गीतांचा आनंद विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलानात लुटला.व शाळेतील ओपनिंगपासून सन 1991 पासुन आजपर्यंतचा सर्व क्षेत्रातील प्रवास विद्यार्थ्यांनी नाटकाद्वारे सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री .एस.डी.देशमुख यांचे सन २०२० हे निवृत्तीचे वर्ष.माझ्या शाळेतील इ.८ वी व ९ वी चे विद्यार्थी जशा गांधी टोपी घालून शाळेत येतात. तसेच मी पण टोपी घालून शाळेत येईन.त्याप्रमाणे ते साने गुरुजी जयंती पासून शाळेत टोपी घालून येतात.साने गुरुजींचे विचारांचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी खेडयात व वार्डात जावून जीवन सार्थक योजनेचा संकल्प श्री.संदिप घोरपडे यांनी केला.
वार्षिक पारितोषिक वितरण
मार्च २०१९ या परीक्षेत व इ.८ व ९ वी या वर्गात शाळेतून प्रथम, द्वितीय,तृतीय,विविध स्पर्धा परीक्षा-टिळक विदयापीठ मराठी, इंग्रजी ,M.T.S., भारती विद्यापीठ पूणे,(गणित),क्रिडा क्षेत्र- विभाग व राज्य स्तर ,अशा विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथी प्रा.डाँ.विनय जोशी व डाँ.मयुरी संदीप जोशी यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.एस.डी.देशमुख यांनी केले. सदर प्रसंगी श्री.विनय जोशी,सौ.मयुरी जोशी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व भावी पिढीला शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला श्री.भास्कर रामचंद्र बोरसे,गुणवंतराव गुलाबराव पाटील, श्री.अशोक के.बाविस्कर, संदीप बी.घोरपडे, हेमकांत अनंतराव पाटील,प्रा.डॉ.शेख शकील जलालोद्दीन,श्री.संदीप वायाळ,श्री.एस.डी.देशमुख,श्रीमती अनिता डी.बोरसे,श्री.शिरीष देशमुख (लेफ्टनंट) श्री. मनिष उघडे,श्री दिलीप पाटील ,
शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री .विलास चौधरी श्री .जे.एस पाटील,उंबरकर मॅडम सौ. सावंत मॅडम व डी.ए.धनगर यांनी केले .





