अमळनेर- येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूलचे उपक्रमशील शिक्षक शरद भिका पाटील हे नुकत्याच 'एनटीए' या संस्थेने घेतलेल्या 'नेट' या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेत मराठी विषयात उत्तीर्ण झाले. छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समिती,नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या शक्ती-विजय भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचे त्यांना मार्गदर्शन लाभले. त्यांनी इंग्रजी व मराठी या विषयात पदव्युत्तर पदवी(एम.ए) मिळवली आहे. सध्या ते आर्मी स्कूलमध्ये इंग्रजी विषयाचे अध्यापन करत आहेत. त्यांच्या यशाबद्दल माजी केंद्रीयमंत्री तथा नवलभाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय नवल पाटील, कार्याध्यक्ष अनिकेत पाटील,रुख्मिणिताई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शिलाताई पाटील, प्रशासकीय अधिकारी डी.बी.पाटील,प्राचार्य एस.यु.पाटील, शिवशाही फाउंडेशन चे अध्यक्ष जयेशकुमार काटे आदींनी कौतुक केले आहे.



