अमळनेर - अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने सोमवार दि. ६ जानेवारी रोजी आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अमळनेर शहरातील न्यू प्लॉट भागातील श्री शिवाजी महाराज उद्यानात कार्यक्रम होणार आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनसह विविध कार्यक्रम होणार आहेत. सकाळी १० वाजता हा पत्रकार दिन सोहळा होणार आहे. यावेळी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरजी यांच्या प्रतिमेचे सामूहिक पूजन व माल्यार्पण केले जाणार आहे.याप्रसंगी शहरातील सर्व लोकप्रतिनिधी,राजकिय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर,डॉक्टर्स, व्यापारी बांधव, शासकीय अधिकारी आणि हितचिंतक व प्रेमी मंडळींची उपस्थिती लाभणार आहे.तरी शहर व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष,सचिव आणि सदस्यांनी केले आहे.



