संत हरदासराम साहेब व संत गेलाराम साहेब यांचा दोन दिवसीय उत्सव संपन्न शोभायात्रा,महाप्रसाद,भक्तीगीतांच्या कार्यक्रमास भाविकांचा प्रतिसाद

अमळनेर -
येथील सिंधी कॉलनीतील संत बाबा हरदासराम  मंदीर येथे दि.१४ व १५ जानेवारी असे दोन दिवस संत हरदासराम साहेब यांचा १३ वा व संत गेलाराम साहेब यांचा १९ वा धार्मिक उत्सव दरवर्षाप्रमाणे यावर्षीही साजरा करण्यात आला.  या दरम्यान विविध धार्मिक   कार्यक्रम संपन्न झाले.
        बाबा गोधडीवाला धाम अमळनेर नगरात बाबा गोधडीवाला यांचे परम शिष्य श्री.साई देविदासजी महाराज यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम झाले.यात  पंचामृत स्नान,
शोभायात्रा,
सत्संग,अखंड धुनी,प्रसाद भंडारा,धार्मिक भक्तीगीतांचा कार्यक्रम उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. बुधवार दि. १५ जानेवारी रोजी सकाळी पु.श्री संत बाबा हरदासरामजी व ब्रह्मस्वरूप 
पु.संत बाबा गेलाराम साहेबजी यांचे पंचामृत स्नान,बाबाजी प्रतिमेची शोभायात्रा,सत्संग व 
प्रसाद भंडारा असे भरगच्च कार्यक्रम घेण्यात आले. बाबाजींच्या जीवन कार्यावर आधारित नाटक सादर करण्यात आले.    या कार्यक्रमासाठी अमळनेर शहर, जळगाव जिल्हयासह धुळे,नंदुरबार,अकोला,बुलढाणा व बरहाणपूर, खंडवा,सेंधवा या ठिकाणाहून भाविक मोठ्या संख्येने आले होते. बी.एच.आर.
मंडळाचे कार्यकर्ते व समाज बांधवांनी अतिशय उत्साहात व श्रद्धेने कार्यक्रम सुरळीतपणे पार पडावेत यासाठी परिश्रम घेतले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.