संत हरदासराम साहेब व संत गेलाराम साहेब यांचा १४-१५ ला उत्सव अमळनेर येथे दोन दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन


अमळनेर -
येथील सिंधी कॉलनीतील संत बाबा हरदासराम  मंदीर येथे दि.१४ व १५ जानेवारी असे दोन दिवस संत हरदासराम साहेब यांचा १३ वा व संत गेलाराम साहेब यांचा ११ वा धार्मिक उत्सव दरवर्षाप्रमाणे यावर्षीही साजरा करण्यात येणार आहे. या दरम्यान वेगवेगळे  कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
बाबा गोधडीवाला धाम अमळनेर नगरात  बाबा गोधडीवाला यांचे  परम शिष्य श्री.साई देविदासजी महाराज यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम होणार आहेत. यात  पंचामृत स्नान,शोभायात्रा,
सत्संग,अखंड धुनी,प्रसाद भंडारा,धार्मिक भक्तीगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. 
   -/ धार्मिक कार्यक्रम /- 

मंगळवार दि.१४ जानेवारी २०२०
 बुधवार, दि. १५ जानेवारी २०२०
पु.श्री संत बाबा हरदासरामजी
व ब्रह्मस्वरूप पु.संत बाबा
गेलाराम साहेबजी यांचे
पंचामृत स्नान
बाबाजी प्रतिमेची शोभायात्रा
सत्संग व अखंड धुनि साहेब
प्रसाद भंडारा 
पु.श्री संत बाबा हरदासरामजी
 व ब्रह्मस्वरूप पु.संत बाबा
गेलाराम साहेब यांच्या अखंड
धुनी साहेब 
      या कार्यक्रमासाठी जळगाव जिल्हयासह धुळे,नंदुरबार, अकोला,बुलढाणा व बरहाणपूर, खंडवा,सेंधवा या ठिकाणाहून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. अतिशय उत्साहात व श्रद्धेने कार्यक्रम होत असतात. कार्यक्रम सुरळीतपणे पार पडावेत यासाठी बी.एच.आर. मंडळाचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.