अमळनेर पोलीस स्टेशनचे गोपनीय शाखेचे अंमलदार शरद पाटील यांना पीएच. डी.पदवी प्राप्त

अमळनेर -
येथील पोलीस स्टेशनला गोपनीय शाखेत अंमलदार पदावर कार्यरत असलेले शरद पाटील यांना आज कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने राज्यशास्त्र विषयात पीएच. डी.पदवी प्राप्त झाली आहे. 
     शरद पाटील हे पोलीस दलात गेल्या 14 वर्षांपासून कार्यरत आहेत. अत्यंत कठीण जबाबदारीची पद असूनही  शिक्षणात काहीतरी नवीन करण्याच्या उद्देशाने त्यांनी शिक्षण क्षेत्रात विविध पदव्या प्राप्त केल्या आहेत.

त्यात प्रामुख्याने दहावी नंतर फिटर व वायरमन या दोन विषयात आयटीआय मधून पदवी घेतली. त्याच बरोबर सीएनसी ऑपरेटींग पदविका, कृषी पदविका, बारावी, टायपिंग इंग्रजी-60 मराठी-40 व हिंदी-40, एमएससीआयटी, बीए समाजशास्त्र तर राज्यशास्त्र या विषयात मास्टर डिग्री, केली त्याच बरोबर कॉम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंग पदवी, बी.एड.  आणि आता शिक्षण क्षेत्रातील सर्वात महत्त्वाची म्हणजे पीएच. डी.अशी मोठीच शैक्षणिक वाटचाल शरद पाटील यांची आहे.
 "भारतीय राजकारणातील नवीन प्रवाह" (विशेष संदर्भ:आम आदमी पार्टी) विषयावर संशोधन केले आहे. त्यांनी प्रताप महाविद्यालयातील प्रा.डॉ.विजय तुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली आपले संशोधन पूर्ण केले आहे. आज त्यांना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.पी.पाटील यांच्या हस्ते पीएच.डी. देऊन गौरविण्यात करण्यात आले. यावेळी मार्गदर्शक प्रा. डॉ.विजय तुंटे,  त्यांचे भाऊ प्रकाश तुकाराम पाटील, सिनियर स्टेनोग्रापर अमळनेर कोर्ट सोबत होते। त्यांचा सत्कार जळगांव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी केला तसेच अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गोरे,अमळनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे व पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी देखील सत्कार केले.  डॉ.शरद पाटील यांच्या या यशाबद्दल त्यांचेवर अमळनेरकर जनता जनार्दन अभिनंदनाचा वर्षाव करीत आहे. त्यांना विशेषतः अमळनेर हेडलाइन्स परिवारातर्फे खूप खूप अभिनंदन...!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.